February 6, 2025 11:17 AM February 6, 2025 11:17 AM

views 11

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज नांदेड दौरा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर मतदारांचे आणि लाडक्या बहिणींचे आभार मानण्यासाठी नांदेडमध्ये ते जाहीर सभा घेणार आहेत. नांदेड इथल्या श्री हुजूर साहेब सचखंड गुरुद्वाराला देखील शिंदे भेट देणार आहेत.

February 4, 2025 3:49 PM February 4, 2025 3:49 PM

views 14

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना कोणताही अडथळा न येता सुरूच राहील – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत कोणताही अडथळा न येता सुरूच राहील, याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ठाण्यात काल झालेल्या एका मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. लाडकी बहिण योजना बंद करायला महायुती सरकारचा कोणताही विचार नसल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. मुंबई, ठाणे,पुणे आणि इतर शहरांतल्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पाबद्दल उपमुख्यमंत्री शिदे यांनी चिंता व्यक्त केली. २५ वर्षांहून अधिक काळ प्रलंबित विकास प्रकल्प...

January 22, 2025 3:54 PM January 22, 2025 3:54 PM

views 2

केईएम रुग्णालयामध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावेत – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केईएम रुग्णालय मुंबईकरांचा खऱ्या अर्थाने आधारवड असून त्यांना जागा कमी पडू नये यासाठी केईएम मध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावेत असे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. ते केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी समारंभात बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आदी मान्यवर उपस्थित होते. केईएमने घेतलेलं रुग्णसेवेचं व्रत अवघड आहे. आजही इथली रुग्णसेवा अहोरात्र चालू आहे. इथल्या डॉक्टरांचे, नर्सेसचे, कर्म...