February 11, 2025 3:18 PM February 11, 2025 3:18 PM

views 79

राज्यात दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण आणि सक्षमीकरणाकरिता जिल्हा वार्षिक योजनेत एक टक्का निधी राखीव ठेवण्यात येणार

येत्या आर्थिक वर्षापासून दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण आणि सक्षमीकरणाकरता जिल्हा वार्षिक योजनेतून एक टक्का निधी राखीव ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. यासंदर्भातला शासन आदेश काल जारी झाला. या निधीच्या योग्य विनियोग होण्यासाठी सुस्पष्ट आदेश लवकरच नियोजन विभाग, वित्त विभागाच्या मान्यतेने दिव्यांग कल्याण विभाग निर्गमित करेल, असंही त्यांनी सांगितलं.

February 11, 2025 1:17 PM February 11, 2025 1:17 PM

views 7

बोराडे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

बोराडे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. बोराडे यांच्या निधनानं सिद्धहस्त लेखक आणि प्रतिभावान साहित्यिक हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. बोराडे यांच्या जाण्यानं साहित्यातली शहरी आणि ग्रामीण भागाची नाळ तुटली असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. बोराडे यांच्या निधनाबद्दल सर्वत्र विशेषतः साहित्य वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  

February 6, 2025 10:59 AM February 6, 2025 10:59 AM

views 8

अक्षय ऊर्जा निर्मिती संदर्भात सर्व जिल्ह्यांनी सकारात्मकतेनं काम करावं – उपमुख्यमंत्री अजित पवार

केंद्र आणि राज्य शासनाच्या अक्षय ऊर्जा निर्मिती संदर्भात सर्व जिल्ह्यांनी सकारात्मकतेनं काम करावं अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्यामध्ये शाळा, कार्यालयांच्या सौर ऊर्जेसंदर्भातल्या प्रस्तावाचा समावेश करावा, असंही त्यांनी सांगितलं. सर्व जिल्ह्यांच्या वार्षिक योजनेसंदर्भात काल मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय ई बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला उपस्थित लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांबाबतचे प्रस्ताव सादर केले.

February 3, 2025 3:27 PM February 3, 2025 3:27 PM

views 14

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराची व्यवहार्यता तपासून पाहावी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

कृषी क्षेत्रात एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन असून त्यासाठी व्यवहार्यता तपासून पाहावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या संदर्भात पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. पीक आरोग्याचं विश्लेषण, मातीतल्या कार्बनचं प्रमाण शोधणं, मातीच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती, तणाचे प्रकार ओळखणं, मातीचं तापमान, पिकांवरची कीड तसंच रोगांचा प्रादुर्भाव ओळखणं एआयच्या वापरामुळे शक्य होणार आहे. त्यामुळे एआयच्या प्रायोगिक...

October 3, 2024 3:14 PM October 3, 2024 3:14 PM

views 22

लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसऱ्या टप्प्यातली लाभाची रक्कम जमा झाल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातल्या १ कोटी ९६ लाख ४३ हजार २०७ पात्र महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यातली लाभाची रक्कम जमा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांनी उर्वरित पात्र महिलांच्या खात्यातही लवकरच रक्कम जमा होईल असं म्हटलं आहे. राज्यातल्या २ कोटी महिलांना लाभ मिळालेली ही सर्वात मोठी आणि ऐतिहासिक योजना असल्याचंही पवार आपल्या संदेशात म्हणाले.

September 30, 2024 7:47 PM September 30, 2024 7:47 PM

views 11

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा उदगीरमधे दाखल

लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथल्या पंचायत समितीच्या नव्या इमारतीचं तसंच तहसील आणि प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेनिमित्त ते आज उदगीर इथं आले होते. यानिमित्त आयोजित मेळाव्याला पवार यांनी संबोधित केलं. मेळाव्यानंतर ते पोलिसांची वसाहत, उपविभागीय अधिकारी  कार्यालय आणि शहर पोलीस ठाण्याच्या इमारतीचं उद्घाटन करणार आहेत.

September 23, 2024 7:50 PM September 23, 2024 7:50 PM

views 7

महाराष्ट्रात ऊसाचा गळीत हंगाम येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार

महाराष्ट्रात ऊसाचा गळीत हंगाम येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयानं कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. ऊस गाळप आढावा आणि हंगाम नियोजनाबाबत त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. दिवाळी सण, विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तारखा या सर्वांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून ही तारीख ठरवल्याचं त्यांनी सांगितलं.

September 19, 2024 4:47 PM September 19, 2024 4:47 PM

views 20

बुलढाणा शहरात २६ स्मारकांचं लोकार्पण

बुलडाणा इथं आज छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह बुलढाणा शहरात २६ स्मारकांचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत झालं. त्यानंतर मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.