October 26, 2024 5:59 PM

views 20

उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये काही जागांची अदलाबदल करण्यासंदर्भात चर्चा

उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये काही जागांची अदलाबदल करण्यासंदर्भात आज चर्चा झाली. काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. १८० पेक्षा अधिक जागा लढण्याचं महाविकास आघाडीचं लक्ष्य असल्याचं ते यावेळी म्हणाले. जागावाटपाच्या चर्चा शेवटच्या क्षणापर्यंत चालू असतात, महाविकास आघाडीचे घटक पक्ष मैत्रिपूर्ण लढती करणार नाहीत, असंही थोरात यांनी स्पष्ट केलं.

August 24, 2024 7:02 PM

views 21

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन राज्य सरकारच्या राजीनाम्याची आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विरोधकांची मागणी

  बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी सरकारचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या घटकपक्षांतर्फे राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. या मुद्द्यावर पुकारलेला बंद बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज केवळ निदर्शनं करण्याचा निर्णय मविआने घेतला.     ठाण्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. या घटनांना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्...

July 2, 2024 7:19 PM

views 27

अंबादास दानवे यांचं निलंबन हा एकतर्फी, आणि लोकशाहीविरोधी निर्णय असल्याची उद्धव ठाकरे यांची टीका

विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन हे एकतर्फी असून हा लोकशाहीविरोधी निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. सभागृहात एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा करणं, दोन्ही बाजू मांडू देणं आवश्यक असतं. मात्र दानवेंना बाजू मांडायला वेळ दिली गेली नाही, असं ठाकरे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. विधानपरिषद निवडणुकीतला आपला विजय झाकोळून टाकण्यासाठी हा निर्णय घेतला असून षडयंत्र रचून दानवे यांना निलंबित केल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला.