February 11, 2025 2:28 PM February 11, 2025 2:28 PM

views 5

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत १२९ पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने पदक तालिकेत दुसरं स्थान पटकावलं आहे. महाराष्ट्राकडे सध्या सर्वाधिक १२९ पदकं असून यात ३३ सुवर्ण, ४८ रौप्य आणि ४८ कांस्य पदकांचा समावेश आहे. सेनादलं ४९ सुवर्ण पदकांसह पहिल्या स्थानावर असून कर्नाटक ३२ सुवर्णपदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

December 8, 2024 2:36 PM December 8, 2024 2:36 PM

views 12

चारधाम यात्रेचा आज उत्तराखंड येथे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते प्रारंभ

बहुप्रतिक्षित चारधाम यात्रेचा आज उत्तराखंड इथे, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते प्रारंभ झाला. रुद्रप्रयाग जिल्ह्यात उखीमठ इथल्या ओंकारेश्वर मंदिरात धामी यांनी यात्रेला सुरुवात झाल्याची घोषणा केली. चारधाम यात्रेकरूंना आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले. ही यात्रा सुरळितपणे तसंच सुरक्षितपणे व्हावी यासाठी मार्गदर्शक तत्वं जारी केली असून त्यानुसार व्यवस्था करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचं धामी म्हणाले.  

November 12, 2024 2:32 PM November 12, 2024 2:32 PM

views 17

उत्तराखंडमध्ये डेहराडून शहरात झालेल्या भीषण कार अपघातात ६ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधे डेहराडून शहरात काल रात्री उशिरा झालेल्या भीषण कार अपघातात ६जणांचा मृत्यू झाला. तर एका प्रवाशाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरधाव कंटेनरने इनोव्हा कारला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला, असं पोलिसांनी सांगितलं.

August 10, 2024 1:55 PM August 10, 2024 1:55 PM

views 12

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानच्या पूर्व भागात या आठवड्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानच्या पूर्व भागात या आठवड्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा भारतीय हवामानशास्त्रविभागाचा अंदाज आहे. जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा, चंडीगढ, दिल्ली आणि राजस्थानच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्यप्रदेशच्या पूर्व भागात तुरळक ठिकाणीजोरदार पावसाची शक्यता आहे. पूर्व आणि ईशान्य भारतातही हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे.