February 6, 2025 1:55 PM February 6, 2025 1:55 PM
4
अरुणाचलप्रदेश आणि आसाममध्ये पुढीलं दोन दिवस पडणार जोरदार पाऊस – हवामान विभाग
ईशान्य भारतात अरुणाचलप्रदेश आणि आसाममध्ये पुढले दोन दिवस जोरदार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्यप्रदेशात राजधानी भोपळसह इतर भागात थंडीचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे, तरी पुढले काही दिवस सकाळ आणि रात्रीच्या तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस घट होईल असा अंदाज आहे. राजस्थानमध्ये गेले काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे थंडीचा जोर आणखी वाढेल असा अंदाज आहे. सीकर, चूरू, झुंझुनूं आणि नागौर इथं आज थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.