April 15, 2025 2:49 PM

views 24

४८ हजार कोटी रुपयांच्या पीएसीएल घोटाळ्याबद्दल, ईडीचे १५ हून अधिक ठिकाणी छापे

काँग्रेस नेता प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाडरा यांच्या हरियाणातल्या जमीन घोटाळ्यातल्या सहभागाबद्दल सक्तवसुली संचालनालयामार्फत सध्या चौकशी सुरु आहे. वाडरा यांच्या कंपनीने गुरुग्राम इथं केलेल्या जमीन खरेदीचा या खटल्याशी संबंध आहे. नवी दिल्लीतल्या संचालनालयाच्या कार्यालयात वाडरा आज सकाळी चौकशीसाठी हजर झाले होते. राजस्थानचे माजी मंत्री प्रताप सिंग खचारियावस यांच्या घरासह १५ ठिकाणी आज सक्तवसुली संचालनालयाने छापे टाकले . मेसर्स पी ए सी एल शी संबंधित ४८ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याबद्दल सुरु असल...

October 28, 2024 6:44 PM

views 13

ईडीची बँक घोटाळा प्रकरणात नागपूरच्या एका व्यावसायिकाच्या मालमत्तेवर टाच

बँक घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने नागपूरच्या एका व्यावसायिकाची सुमारे ५०३ कोटी रुपये मूल्याच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. मेसर्स कॉर्पोरेट पॉवर लिमिटेड आणि त्यांच्या प्रवर्तकांच्या स्थावर आणि जंगम मालमत्ता महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि आंध्रप्रदेशातल्या विविध ठिकाणाहून जप्त केल्या आहेत. त्यात बँकेतली रोकड, म्युच्युअल फंड, समभाग, भूखंड आणि कंपनी यांचा समावेश आहे. विविध बँकांना मिळून सुमारे चार हजार सात कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही कारवाई ईडीने केली आहे.

September 24, 2024 8:27 PM

views 18

ज्ञानराधा बहुराज्य सहकारी पतसंस्था घोटाळाप्रकरणी ईडीची कारवाई

ज्ञानराधा बहुराज्य सहकारी पतसंस्था घोटाळाप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज ८५ कोटी ८८ लाख रुपये किंमतीच्या स्थावर मालमत्तांवर टाच आणली. मुंबई, पुणे औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या निवासी सदनिका, व्यावसायिक कार्यालयांच्या जागा, आणि भूखंडाचा त्यात समावेश आहे. आतापर्यंत याप्रकरणी ९५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या मालमत्तांवर जप्ती किंवा टाच आणली आहे. 

August 30, 2024 10:49 AM

views 18

अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचे देशभरात दहा ठिकाणी छापे

सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं आखाती देशांतून कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर जसमीत हकीमजादा प्रकरणी काल देशभरात दिल्ली, अमृतसर, जालंधर, मुंबई, सोलापूर आणि इंदूर अशा दहा ठिकाणी छापे टाकले. अमेरिकेच्या फॉरेन नार्कोटिक्स किंगपिन डेजिगेशन अॅक्टअंतर्गत 'महत्त्वपूर्ण परदेशी अंमली पदार्थ तस्कर' म्हणूनही त्याची नोंद आहे. पी एम एल ए कायद्यातील तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली. दुबईत राहणारा जसमीत भारतात अंमली पदार्थांचा व्यापार चालवत असल्याचं ईडीच्या तपासात निष्पन्न झालं आहे.

July 1, 2024 6:08 PM

views 25

केंद्र सरकार ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करत असल्याचा विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा आरोप

केंद्र सरकार ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने आज संसदेच्या आवारात निदर्शनं केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर ज्येष्ठ नेते या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. आम आदमी पक्षाच्या नेत्यांची तुरुंगातून सुटका करावी अशी मागणीही यावेळी विरोधकांनी केली.