June 20, 2024 12:38 PM June 20, 2024 12:38 PM
24
IRGC कॅनडामध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित
कॅनडानं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोर म्हणजेच IRGC या इराणी सशस्त्र दलाच्या शाखेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री डॉमिनिक लेब्लँक यांनी काल ही घोषणा करताना सांगितलं की कॅनडा IRGC च्या दहशतवादी कारवायांचा सामना करण्यासाठी सर्व उपाय लागू करेल. IRGC सदस्यांसह हजारो वरिष्ठ इराणी सरकारी अधिकाऱ्यांना आता कॅनडामध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे आणि जे आधीच देशात आहेत त्यांची चौकशी करून त्यांना बाहेर काढले जाऊ शकते. बँका आणि ब्रोकरेज यांसारख्...