June 13, 2025 10:37 AM June 13, 2025 10:37 AM

views 8

इस्रायली हवाई दलाचे इराणवर हल्ले; इस्राइलमध्ये आणीबाणी जाहीर

इस्रायली हवाई दलाने काल रात्री इराणवर हवाई हल्ले केले. इराणची राजधानी तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले, अशी माहिती इराणच्या वृत्तसंस्थेनं दिली. इराणच्या अण्वस्त्र असलेल्या ठिकाणांना आणि लष्करी स्थळांना लक्ष्य केले असल्याचं इस्रायली संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी म्हटलं आहे. इस्रायलने देशभरात विशेष आणीबाणी जाहीर केली असून आज इस्रायलमध्ये शाळा बंद राहतील. अशी माहिती इस्रायली संरक्षण मंत्र्यांनी दिली.