June 13, 2025 2:24 PM June 13, 2025 2:24 PM

views 15

इस्रायल आणि इराणमधील भारतीय दूतावासांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा दिला सल्ला

इस्राएल आणि इराण मधल्या भारतीय दूतावास अधिकाऱ्यांनी सतर्क राहून परिस्थितीवर लक्ष ठेवावं अशा सूचना दूतावासांनी दिल्या आहेत. इस्राएलनं इराणवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना दिल्याचं दूतावासानं समाजमाध्यमांत लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. दोन्ही देशातल्या भारतीय नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावेत, सुरक्षित निवाऱ्यांच्या जवळपास राहावे तसंच पुढील काळातल्या सूचनांसाठी दूतावासाच्या समाजमाध्यम खात्यांवरचे संदेश पाहावेत असं आवाहन दूतावासानं केलं आहे.

September 28, 2024 8:43 PM September 28, 2024 8:43 PM

views 8

इस्रायलने बैरूतवर केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्हाचा प्रमुख नेता हसन नसरल्लाह ठार

इस्रायलने काल बैरूतवर केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्हाचा प्रमुख नेता हसन नसरल्लाह ठार झाला आहे. इस्रायलचे चे लष्करी प्रवक्ता नादाव शोशानी यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. लेबननच्या सशस्त्र दलानही याची पुष्टी केली आहे. नसराल्लाह हा गेल्या ३२ वर्षांपासून इराणच्या समर्थक हिजबुल्लाह गटाचा प्रमुख होता.

September 24, 2024 8:18 PM September 24, 2024 8:18 PM

views 6

इस्रायलने लेबनॉनमधल्या हिजबुल्लांच्या ठिकाणांवर केलेल्या हवाई हल्ल्यातल्या मृतांची संख्या ५५८ वर

इस्रायलने लेबनॉनमधल्या हिजबुल्लांच्या ठिकाणांवर केलेल्या हवाई हल्ल्यातल्या मृतांची संख्या ५५८ वर पोहचली आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात कालपासून सुरु असलेल्या संघर्षात आतापर्यंत अठराशे ३५ लोक जखमी झाल्याची माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. लेबनॉनमध्ये कारवाया वाढवणार असल्याचं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे. इस्रायलच्या इल्याकिम लष्करी तळावर फादी २ क्षेपणास्त्रांद्वारे बॉम्बहल्ला केल्याचं हिजबुल्लानं म्हटलं आहे.

September 23, 2024 8:24 PM September 23, 2024 8:24 PM

views 4

लेबननमध्ये आज सकाळपासून इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान १८२ जण ठार

लेबननमध्ये आज सकाळपासून इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान १८२ जण ठार झाले असून ७२७ जण जखमी झाले आहेत. यात बालकं, महिला, आणि आरोग्यसेवकांचा समावेश असल्याचं लेबननच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. लेबननमधल्या ३०० ठिकाणांवर हल्ले केल्याची माहिती इस्रायली सैन्यानं दिली आहे.    दुसऱ्या बाजूला, हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेनं इस्रायलच्या उत्तर भागातल्या लष्करी तळांवर आणि रसद गोदामांवर क्षेपणास्त्र डागली आहेत. इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचं हिजबुल्लाहनं म...

July 23, 2024 1:33 PM July 23, 2024 1:33 PM

views 14

सिरीयाच्या सोशल नॅशनालिस्ट पार्टीचा एक सदस्य ठार

दक्षिण लेबनॉनमधल्या चिहिन नगरपालिकेत काल इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात सिरीयाच्या सोशल नॅशनालिस्ट पार्टीचा एक सदस्य ठार झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. इस्रायलच्या लढाऊ विमानानं चिहिनमधल्या एका घरावर दोन क्षेपणास्त्र डागली असल्याची माहिती लेबनॉनच्या सैन्यानं एका निवेदनात दिली आहे.

June 30, 2024 1:40 PM June 30, 2024 1:40 PM

views 18

गाझापट्टीत इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ४० पॅलेस्टिनींचा मृत्यू , २२४ जण जखमी

गाझापट्टीत इस्रायलने गेल्या चोवीस तासात केलेल्या हल्ल्यात ४० पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून २२४ जण जखमी झाले आहेत. इस्रायलने गाझाविरोधात युद्ध सुरू केल्यापासून आतापर्यंत पॅलेस्टाईनचे ३७ हजाराहून अधिक नागरिक मरण पावले असून ८६ हजारांहून अधिक नागरिक जखमी झाल्याचं गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. तर इस्रायली लष्कर गाझापट्टीतल्या शुजैया परिसरातल्या दहशतवादी तळांवर सातत्यानं हल्ले करत असल्याचं इस्रायली लष्कराचे प्रवक्ते अविचे अद्रेई यांनी सांगितलं.