February 7, 2025 2:07 PM February 7, 2025 2:07 PM
4
इस्राएलने लेबनॉनच्या दक्षिण आणि पूर्व भागात अनेक ठिकाणी केले हवाई हल्ले
इस्राएलनं काल रात्री लेबनॉनच्या दक्षिण आणि पूर्व भागात अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले. इस्राएलच्या लढाऊ विमानांनी पूर्व लेबनॉनच्या बाल्बेक जिल्ह्यातल्या पर्वत रांगांमध्ये, तसंच दक्षिण लेबनॉनमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केल्याचं लेबनॉनच्या वृत्त संस्थेनं म्हटलं आहे. हवाई हल्ल्यांपूर्वी, इस्रायली विमानांनी रशाया आणि पश्चिम बेका या शहरांवरून कमी उंचीवरून घिरट्या घातल्या. बैरुत शहर आणि उपनगरांवरूनही इस्रायली जेट विमानं घिरट्या घालताना दिसल्याचं यात म्हटलं आहे. लेबॅनॉनचा हेझबोल्ला हा सशस्त्र गट आणि इस्रायली ...