January 16, 2025 1:41 PM January 16, 2025 1:41 PM
16
इस्रायल आणि हमास यांची युद्धबंदीसाठी सहमती
इस्रायल आणि हमास यांनी युद्धबंदीला सहमती दर्शवली आहे. कतारचे प्रधानमंत्री मोहंमद बिन अब्दुल रेहमान अल-थानी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर या कराराचं स्वरूप निश्चित करण्यात आलं. या कराराची अंमलबजावणी रविवारपासून होणार असून ही युद्धबंदी ४२ दिवसांची असेल. अल थानी यांनी काल दोहामध्ये या कराराबाबत माहिती दिली. या करारामुळे इस्रायलच्या ओलिसांची मुक्तता केली जाईल आणि गाझामध्ये मानवतावादी मदतीला चालना मिळेल. इस्रायलमधल्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक होऊ...