June 18, 2025 10:06 AM June 18, 2025 10:06 AM

views 12

इराणला बिनशर्त शरणागती पत्करण्याचा अमेरिकेचा इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्य़क्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बिनशर्त शरणागती पत्करण्याचा इशारा दिला आहे. समाज माध्यमांवरील संदेशातून ट्रम्प यांनी, इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनी यांना पदच्युत करण्याची कारवाई न करता अमेरिका त्यांना जीवे मारू शकते मात्र सद्यस्थितीत अमेरिका अशा प्रकारची कारवाई टाळत असल्याचे म्हटले आहे. नागरिकांवर किंवा अमेरिकन सैनिकांवर क्षेपणास्त्रे डागायची नाहीत यासाठीच अमेरिका कोणतेही पाऊल उचलत नसल्याचे म्हटलं आहे. इराणला बिनशर्त आत्मसर्मपण करण्याचे आवाहन करून त्यांनी खमेनी कुठे लपले आह...

June 13, 2025 2:24 PM June 13, 2025 2:24 PM

views 17

इस्रायल आणि इराणमधील भारतीय दूतावासांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा दिला सल्ला

इस्राएल आणि इराण मधल्या भारतीय दूतावास अधिकाऱ्यांनी सतर्क राहून परिस्थितीवर लक्ष ठेवावं अशा सूचना दूतावासांनी दिल्या आहेत. इस्राएलनं इराणवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना दिल्याचं दूतावासानं समाजमाध्यमांत लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. दोन्ही देशातल्या भारतीय नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावेत, सुरक्षित निवाऱ्यांच्या जवळपास राहावे तसंच पुढील काळातल्या सूचनांसाठी दूतावासाच्या समाजमाध्यम खात्यांवरचे संदेश पाहावेत असं आवाहन दूतावासानं केलं आहे.

April 15, 2025 3:42 PM April 15, 2025 3:42 PM

views 9

अमेरिका आणि इराण दरम्यान तेहरान अणू प्रकल्पाबाबतच्या चर्चेची दुसरी फेरी शनिवारी रोममध्ये होण्याची शक्यता

अमेरिका आणि इराण यांच्यातील तेहरान अणू प्रकल्पाबाबतच्या चर्चेची दुसरी फेरी शनिवारी रोममध्ये होण्याची शक्यता आहे. इटलीचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अंटोनिओ ताजानी यानी ही बैठक रोममध्ये आयोजित करण्यास रोम तयार असल्याचं काल जाहीर केलं. ताजानी सध्या जपानच्या दौऱ्यावर असून, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. अमेरिका आणि इराण यांच्यातील अण्वस्त्राबाबतचा संघर्ष चर्चेनं सुटेल आणि शांतता प्रस्थापित होण्यास मदत मिळेल, असंही ते म्हणाले. या चर्चेसाठी ओमान मध्यस्थाची भूमिका बजावत असून, पहिली फेरी १२ एप्रिल रोजी ओम...

February 3, 2025 10:55 AM February 3, 2025 10:55 AM

views 7

इराणने तीन स्वदेशी नव्या विकसित उपग्रहांचे केले अनावरण

अंतराळ तंत्रज्ञान दिनानिमित्त, इराणच्या राजधानीत काल तीन स्वदेशी नव्या विकसित उपग्रहांचे अनावरण इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि इतर संबंधितांच्या उपस्थितीत कऱण्यात आलं. नवाक 1, पार्स 2 आणि पार्स 1 चे अद्ययावत मॉडेल अशी त्यांची नावं आहेत. इराण अंतराळ संशोधन केंद्रानं विकसित केलेला नवाक संप्रेषण उपग्रह स्वदेशी सिमोर्ग प्रक्षेपका वाहनाच्या सुधारित आवृत्तीची चाचणी घेण्यासाठी निर्माण कऱण्यात आला असून त्यात डोसिमेट्री पेलोड, मॅग्नेटोमीटर सेन्सर बसवण्यात आले आहेत.

June 20, 2024 12:38 PM June 20, 2024 12:38 PM

views 29

IRGC कॅनडामध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित

कॅनडानं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोर म्हणजेच IRGC या इराणी सशस्त्र दलाच्या शाखेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री डॉमिनिक लेब्लँक यांनी काल ही घोषणा करताना सांगितलं की कॅनडा IRGC च्या दहशतवादी कारवायांचा सामना करण्यासाठी सर्व उपाय लागू करेल. IRGC सदस्यांसह हजारो वरिष्ठ इराणी सरकारी अधिकाऱ्यांना आता कॅनडामध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे आणि जे आधीच देशात आहेत त्यांची चौकशी करून त्यांना बाहेर काढले जाऊ शकते. बँका आणि ब्रोकरेज यांसारख्...