August 27, 2024 8:32 PM August 27, 2024 8:32 PM

views 5

टेनिस स्पर्धेत पोलंडची इगा श्वियांतेक, स्पेनचा कार्लोस अल्काराज आणि इटलीचा यानिक सिनर मैदानात

यूएस खुल्या टेनिस स्पर्धेत आज पोलंडची इगा श्वियांतेक, स्पेनचा कार्लोस अल्काराज आणि इटलीचा यानिक सिनर मैदानात उतरतील. अग्रमानांकित यानिक सिनर कथित अंमली पदार्थ सेवन प्रकरणानंतर पहिल्यांदाच खेळणार आहे. या वर्षीच्या तीनपैकी दोन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकलेल्या कार्लोस अल्काराजकडेही टेनिसप्रेमींचं लक्ष असणार आहे. इगा श्वियांतेक आणि कार्लोस अल्काराज या दोघांनीही २०२२मध्ये या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं आणि आता या वर्षीच्या शेवटच्या ग्रँडस्लॅममध्ये ते जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

June 15, 2024 8:22 PM June 15, 2024 8:22 PM

views 24

जी-सेवन परिषदेत भावी पिढीसाठी उत्तम जगाची निर्मिती करण्यासाठी सर्वांनी वचनबद्धता दर्शवल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

जी-सेवन परिषदेत जागतिक समुदायाला लाभदायक ठरतील अशा प्रभावी उपाययोजना आखण्यासह भावी पिढीसाठी एका उत्तम जगाची निर्मिती करण्यासाठी सर्वांनी वचनबद्धता दर्शवली, असं प्रतिपादन  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. इटलीचा दौरा आटोपून नवी दिल्लीला परतल्यानंतर हा दौरा अतिशय फलदायी झाल्याचं त्यांनी समाज माध्यमवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या दौऱ्यात जागतिक नेत्यांशी विविध विषयांवर चर्चा झाली, असं त्यांनी सांगितलं.  या परिषदेनिमित्त जमलेल्या इतर राष्ट्रप्रमुखांशी प्रधानमंत्र्यांनी या दौऱ्यात चर्चा केली...

June 14, 2024 7:45 PM June 14, 2024 7:45 PM

views 19

प्रधानमंत्र्यांची इटलीमधे विविध राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा संपन्न

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीमधे अपुलिया इथं आज विविध राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा केली. जी सेव्हन देशांच्या शिखर परिषदेसाठी मोदी सध्या इटलीत आहेत. आज दुपारी त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, अंतराळ, शिक्षण, हवामान बदल, पायाभूत सुविधा, उर्जा, क्रीडा इत्यदी क्षेत्रातल्या परस्पर सहकार्याविषयी त्यांची बातचीत झाली. जागतिक आणि क्षेत्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवरही उभय नेत्यांमधे विचारांची देवाण घेवाण झाली. पुढच्या वर्षी फ्रान्समधे होणाऱ्या क...

June 13, 2024 9:16 PM June 13, 2024 9:16 PM

views 39

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी-शिखर परिषदेसाठी ईटलीला रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आज ईटलीला रवाना झाले. भारत-इटली धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी तसंच भारत-प्रशांत आणि भूमध्यसागरीय प्रदेशांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीला जाण्यापूर्वी दिलं.   इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणावरून ते G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जात आहेत. यानिमित्तानं इटलीला भेट होत असल्याचा मला आनंद आहे, असंही मोदी म्हणाले. या परिषदेत, कृत्रिम बुद्धि...