June 17, 2024 3:04 PM June 17, 2024 3:04 PM

views 18

इक्वेडोर मध्ये रस्त्यावर दरड कोसळल्यानं ८ जणांना मृत्यू

इक्वेडोर मध्ये रस्त्यावर दरड कोसळल्यानं ८ जणांना मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. मध्यवर्ती टुनग्रुव्हा प्रांतातल्या एका मध्यवर्ती मार्गावर ही दरड कोसळ्यानं बानोस दी अगुआ सांता शहराचा मार्ग बंद झाला असून अनेक घरांचही नुकसान झालं आहे. या भागातल्या मुसळधार पावसामुळे तीन औष्णिक वीज निर्मिती केंद्रांचं कामही ठप्प झालं आहे.