June 20, 2025 3:47 PM June 20, 2025 3:47 PM

views 12

आषाढी वारी आणि योगदिनानिमित्त विविध कार्यक्रम

जगदगुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं आज पुण्यात आगमन होणार आहे. या पालख्यांच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. पुणे जिल्हा प्रशासन आणि पुणे महापालिकेतर्फे वारकऱ्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पालख्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातले विविध २६ रस्ते वेगवेगळ्या वेळेत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतील. आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीनं आज सकाळी बेलापूरहून राहुरीकडे प...

June 18, 2025 3:25 PM June 18, 2025 3:25 PM

views 19

आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूमधून प्रस्थान

आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज देहू इथं सुरु झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पादुकांचं पूजन झालं, त्यानंतर पालखी पंढरपूरसाठी मार्गस्थ झाली. देहू इथे संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या भेटीच्या समूहशिल्पाचं आणि संतसृष्टीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. या सोहळ्यात सुमारे ५०० दिंड्या सहभागी झाल्या आहेत. संत ज्ञानेश्वरांची पालखी उद्या आळंदीहून प्रस्थान ठेवेल. त्र्यंबकेश्वर इथून निघालेली संत निवृत्त...

July 1, 2024 1:16 PM July 1, 2024 1:16 PM

views 18

ज्ञानोबा – तुकोबांच्या पालख्या पुण्यात दाखल

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या दोन दिवसांच्या मुक्कमासाठी काल पुण्यात दाखल झाल्या. दोन्ही पालख्यांचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या पाटील इस्टेट चौकात नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं काल बीड जिल्ह्यात परळी इथं आगमन झालं. पालखीचं भाविकांनी उत्स्फुर्तपणे स्वागत केलं. पैठणहून निघालेली संत श्री एकनाथ महाराजांची पालखी काल अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाली. आज मिडसावंगी इथं पालखीचा पहिला रि...

June 14, 2024 7:50 PM June 14, 2024 7:50 PM

views 30

आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना सर्व आवश्यक सोयी सुविधा देण्याचे राज्य सरकारचे प्रशासनाला आदेश

    आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याकरता पंढरपूर पालखी मार्ग, पालखी तळ आदी ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित विभागांना दिले. ते पुणे इथल्या विधान भवनात झालेल्या श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत बोलत होते. इंद्रायणी नदी स्वच्छतेचं काम तातडीनं करावं, पालखी सोहळा झाल्यानंतर पंढरपूर शहरात स्वच्छतेसाठी आवश्यक नियोजन करावं, मानाच्या पालख्यांसह इत...