July 24, 2024 2:58 PM July 24, 2024 2:58 PM

views 29

महिला आशिया टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ उपांत्यफेरीत दाखल

  महिलांच्या आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं अ गटातल्या अंतिम सामन्यात नेपाळवर ८२ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतानं प्रथम फलंदाजी करत १७८ धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना नेपाळला २० षटकांत अवघ्या ९६ धावा करता आल्या. भारताची सलामीवीर शेफाली वर्मा हिनं ४८ चेंडूत ८१ धावा केल्या. दयालन हेमलता हिनं शेफालीसह १२२ धावांची भागीदारी केली. गोलंदाजीत भारताकडून दीप्ती शर्मा हिनं तीन तर राधा यादव आणि अरुंधती रेड्डी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. शेफाली वर्मा हिला ...