April 17, 2025 10:59 AM April 17, 2025 10:59 AM
11
उत्तम आरोग्यासाठी रोज केळी खाण्याचा आरोग्यतज्ञांचा सल्ला
अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघाच्या वतीनं जळगाव जिल्ह्यातल्या रावेर इथं काल जागतिक केळी दिन साजरा करण्यात आला. केळ्यांमधल्या पोषणमूल्यांबाबत जागरूकता वाढून त्याचं सेवन वाढावं यासाठी केळी दिवस साजरा केला जातो... जागतिक केळी उत्पादनाच्या ३० टक्के केळ्यांचं उत्पादन भारतात होतं. मात्र भारतीयांमध्ये आवश्यक त्या प्रमाणात केळी खाल्ली जात नाही. सर्वांगीण दृष्टीनं विचार केल्यास केळी हे सहज उपलब्ध होणारं, पौष्टीक फळ असून, त्याचा आहारात रोज समावेश केल्यास आरोग्य उत्तम राहिल असा सल्ला ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ ड...