September 28, 2024 12:56 PM September 28, 2024 12:56 PM
1
गेल्या 3 वर्षांत 67 कोटींहून अधिक आयुष्मान भारत आरोग्य खाती तयार
आयुष्मान भारत डिजिटल मिशन च्या अंतर्गत गेल्या तीन वर्षांत ६७ कोटी आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट्स अर्था आभा खाती तयार करण्यात आली आहेत. आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या स्थापनेला काल तीन वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त आरोग्य मंत्रालयाने ही माहिती सांगितली. ४२ कोटी आरोग्य नोंदी या आभा खात्याशी संलग्नित आहेत. देशाची डिजिटल आरोग्य सुविधा सुलभ, कार्यक्षम आणि पारदर्शक होण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशन गेल्या तीन वर्षांपासून काम करत असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.