August 30, 2024 6:33 PM August 30, 2024 6:33 PM

views 7

जेएएमच्या प्रवेश परीक्षांसाठीचे अर्ज ३ सप्टेंबरपासून भरता येणार

पदव्युत्तर शिक्षणासाठीची प्रवेश परीक्षा जेएएम च्या प्रवेश परीक्षांसाठीचे अर्ज ३ सप्टेंबरपासून भरता येणार आहेत. यासाठी आयआयटी दिल्लीने एक नोंदणी संकेतस्थळ तयार केलं आहे. या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षांच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवता येईल. प्रवेश परीक्षा २ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार असून येत्या ११ ऑक्टोबर पर्यंत त्यासाठीचे अर्ज भरता येतील. ही परीक्षा संगणक आधारीत होणार असून यामध्ये जैवरसायन शास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, भूगर्भविज्ञान, गणित, गणितीय सांख्य...

July 13, 2024 1:38 PM July 13, 2024 1:38 PM

views 16

प्रसार भारती आणि आयआयटी दिल्लीच्या वतीनं ‘DD-Robocon’ India 2024 चं आयोजन

प्रसार भारती आणि आयआयटी दिल्ली यांच्यावतीनं आजपासून दिल्लीतल्या त्यागराज स्टेडियमवर 'DD-Robocon' India २०२४ चं आयोजन करण्यात आलं आहे. या दोन दिवसीय स्पर्धेत देशातली ४५ हून अधिक महाविद्यालयं, विद्यापीठ आणि इतर शैक्षणिक संस्थांमधले साडेसातशेहून अधिक विद्यार्थी सहभागी होत आहेत.डीडी-रोबोकॉनमधील विजेता संघ व्हिएतनाममधील क्वांगनिन्ह इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय एशिया-पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन रोबोकॉन २०२४ मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करेल.