February 6, 2025 1:40 PM

views 14

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावरील चर्चेला प्रधानमंत्री आज राज्यसभेत उत्तर देणार

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्ताव चर्चेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राज्यसभेत उत्तर देतील. आज संध्याकाळी मोदी सभागृहाला संबोधित करतील, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी दिली. दोन दिवसांपूर्वीच लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलचा आभारप्रस्ताव मंजूर झाला होता.

February 4, 2025 1:51 PM

views 18

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावावरील चर्चेला आज प्रधानमंत्री लोकसभेत उत्तर देणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावावर चर्चेला उत्तर देतील अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी दिली. संध्याकाळी पाच वाजता मोदी चर्चेला उत्तर देणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावरल्या चर्चेला काल संसदेच्या दोन्ही सभागृहात सुरूवात झाली.  

July 2, 2024 6:50 PM

views 29

देश सर्वप्रथम या तत्त्वावरच आपलं सरकार काम करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं लोकसभेत प्रतिपादन

देश सर्वप्रथम या तत्त्वावरच आपलं सरकार काम करत असून भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या आपल्या लढ्यामुळंच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने सलग तिसऱ्यांदा आपल्यावर विश्वास व्यक्त केला आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते.  गेल्या १० वर्षातल्या रालोआ सरकारच्या कामगिरीचा आढावा घेत मोदी यांनी सांगितलं, देशाची अखंडता आणि एकात्मता यांच्या सुरक्षिततेसाठी भारत कोणत्याही थराला जाऊ ...

July 2, 2024 6:12 PM

views 20

राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजप खासदार बांसुरी स्वराज यांनी हक्कभंगाची नोटीस बजावली

आभारप्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान लोकसभेत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल भाजपाच्या बांसुरी स्वराज यांनी आज हक्कभंगाची नोटीस बजावली. राहुल गांधी यांनी सभागृहात सांगितलेल्या काही गोष्टी चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या असून त्याकरता त्यांच्यावर कारवाई करावी असं स्वराज यांनी या नोटिशीत म्हटलं आहे. दरम्यान आपल्या भाषणातले अनेक अंश गाळल्याचा निषेध करुन ते पुन्हा नोंदीत समाविष्ट करण्याची मागणी करणारं पत्र राहुल गांधी यांनी सभापती ओम बिरला यांना लिहीलं आहे.