April 15, 2025 2:46 PM April 15, 2025 2:46 PM

views 12

NDRFच्या पाचव्या बटालियनकडून अतिवृष्टी आणि आपत्ती प्रतिसाद विषयक सरावाचे आयोजन

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पाचव्या बटालियनने आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी आणि आपत्ती प्रतिसाद विषयक सराव आयोजित केले होते. पूर, दरडी कोसळणे, भूकंप तसेच रासायनिक अपघातांना त्वरित प्रतिसाद देऊन कृती करण्याच्या या सरावात १२ विशेष प्रशिक्षित पथकं सहभागी झाली होती. येत्या मान्सूनसाठी या पथकांची सज्जता तपासणे हा या सरावांमागचा हेतू होता.