September 27, 2024 11:02 AM September 27, 2024 11:02 AM

views 5

नागरिकांची संवेदनशील माहिती उघड करणाऱ्या संकेतस्थळांवर केंद्र सरकारकडून प्रतिबंध

आधार आणि पॅनकार्डचे तपशील सार्वजनिक करून नागरिकांची ओळख उघड करणाऱ्या काही संकेतस्थळांवर, केंद्र सरकारनं प्रतिबंध लावले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ही कारवाई केली आहे. आधार कायदा 2016 च्या कलम 26 (४) नुसार आधारकार्डवरील माहिती सार्वजनिक करण्यावर प्रतिबंध आहेत. याचे उल्लंघन संकेतस्थळाकडून झाल्याची तक्रार भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं दाखल केली होती.