February 7, 2025 10:55 AM February 7, 2025 10:55 AM

views 4

अंगणवाडी भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका – आदिती तटकरे

अंगणवाडी भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. एकात्मिक बाल विकास सेवा पर्यवेक्षकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, अधीक्षक ही पदे भरण्यात येत आहे. भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने होणार असल्याचं तटकरे यांनी काल सांगितलं.

February 4, 2025 10:05 AM February 4, 2025 10:05 AM

views 9

महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी- आदिती तटकरे

महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी, असे निर्देश, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. त्या काल याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमत्त महामंडळाअंतर्गत असलेल्या जास्तीत जास्त बचतगटांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं, तसंच महामंडळाचं कार्य ग्रामीण भागातही पोहोचावं, यासाठी राज्यस्तरीय महोत्सवाचं आयोजन करण्याचे निर्देशही तटकरे यांनी दिले.