February 5, 2025 2:02 PM February 5, 2025 2:02 PM

views 15

आकाशवाणीचे माजी वृत्त निवेदक वेंकटरमण यांचं निधन

आकाशवाणीचे माजी वृत्त निवेदक वेंकटरमण यांचं काल रात्री चेन्नई इथं निधन झालं. ते १०२ वर्षांचे होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्याची बातमी तमिळ भाषेत आकाशवाणीवरून त्यांनी पहिल्यांदा दिली होती. ही बातमी रेडिओ सिलोनवरून पहाटे पावणे सहा वाजता प्रसारित झाली होती. वेंकटरमण यांनी आकाशवाणीसाठी नियमित आणि प्रासंगिक कलाकार म्हणून ६४ वर्षे काम केलं.

November 12, 2024 1:56 PM November 12, 2024 1:56 PM

views 9

सार्वजनिक प्रसारण दिन आज होतोय साजरा

सार्वजनिक प्रसारण दिन आज साजरा होत आहे. फाळणीच्या वेळी हरियाणात कुरुक्षेत्र इथं आसरा घेतलेल्या निर्वासितांना आधार देणारं भाषण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १२ नोव्हेंबर १९४७ रोजी आकाशवाणी दिल्लीच्या स्टुडियोमधून केलं होतं. त्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस साजरा होतो. आकाशवाणी दिल्लीच्या सभागृहात आज या निमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन दुपारी ३ वाजल्यापासून होणार आहे. त्यामुळे आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन दुपारी ३ वाजता प...

September 30, 2024 7:11 PM September 30, 2024 7:11 PM

views 9

खाजगी रेडीयो प्रसारण धोरणाच्या विविध मुद्द्यांवर संबधितांच्या सूचना आणि हरकती जाणून घेण्यासंदर्भात सरकारचं नवं पाऊल

खाजगी रेडीयो प्रसारणाचे धोरणाच्या विविध मुद्द्यांवर संबधितांच्या सूचना आणि हरकती जाणून घेण्यासंदर्भात सरकारने पाऊल उचललं आहे. त्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक मंडळाने आज खाजगी रेडिओ प्रसारकांसाठी डिजिटल रेडिओ प्रसारण धोरण नियमावलीशी संबधित  विचारविनिमय टिपण प्रसिद्ध केलं आहे.  या विचारविनिमय टिपणावर संबधितांनी त्याच्या सूचना २८ ऑक्टोबरपर्यंत पाठवायच्या आहेत.  आकाशवाणीने अॅनालॉग मध्यम लहरी आणि लघु लहरी प्रसारणाचं डिजिटाझेशन करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. आकाशवाणीने एफ एमवर डिजिटल रेडिओ तंत्रज्ञ...

June 21, 2024 7:29 PM June 21, 2024 7:29 PM

views 8

आकाशवाणी बातम्यांच्या विश्वासार्हतेच्या बाबतीत अग्रगण्य स्थानावर

आकाशवाणीनं विश्वासार्ह बातम्या देण्याची ओळख जपलेली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या रॉयटर्स इन्स्टिट्यूट फॉर स्टडी ऑफ जर्नालिझमच्या ताज्या वार्षिक सर्वेक्षणात आकाशवाणीच्या बातम्यांच्या विश्वासार्हतेच्या बाबतीत असलेल्या अग्रगण्य स्थानावर शिक्कामोर्तब केलं आहे.  कोणत्याही परिस्थितीत वास्तव बातम्या देण्याच्या आकाशवाणीच्या अतूट वचनबद्धतेचं हे द्योतक आहे, असं प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितलं. सेहगल यांनी आकाशवाणीत झालेल्या योगदिन कार्यक्रमात सहभाग नोंदवला....