June 18, 2025 2:16 PM

views 24

सुरक्षा कर्मचारी आणि सशस्त्र माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन माओवादी नेते ठार

आंध्र प्रदेशात अल्लुरी सीतारामा राजू जिल्ह्यातल्या कोंडामोडलू वनक्षेत्रात सुरक्षा कर्मचारी आणि सशस्त्र माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आज तीन माओवादी नेते ठार झाले. विशेष क्षेत्रीय माओवादी समिती सदस्य अरुणा, केंद्रीय माओवादी समिती सदस्य गजर्ला रवी उर्फ ​​उदय आणि एओबी विशेष क्षेत्रीय माओवादी समितीची सदस्य अंजू हे माओवादी या चकमकीत ठार झाले . सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून तीन एके-४७ रायफल जप्त केल्या आहेत.

December 7, 2024 2:13 PM

views 19

केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा येथे ऊर्जावीर योजनेला होणार सुरुवात

केंद्रीय वीज, गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथं ऊर्जावीर योजनेला सुरुवात होत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. देशात ऊर्जेविषयी जागरुकता निर्माण करून अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं ही योजना सुरु करण्यात आली आहे. यावेळी मनोहर लाल शहर विकास आणि वीजनिर्मिती या मुद्द्यांवर राज्यातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.