January 15, 2025 3:42 PM January 15, 2025 3:42 PM

views 4

आंतरविद्यापीठ नेमबाजी स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाला सुवर्णपदक

चंदीगडच्या पंजाब विद्यापीठात ९ ते १८ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ नेमबाजी स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठानं सुवर्णपदक पटकावलं आहे. ५० मीटर थ्री पोझिशन रायफल नेमबाजीत पुरुष गटात रुद्रांक्ष पाटील याने आपल्या उत्कृष्ट नेमबाजीच्या जोरावर ६०० पैकी ५९३ गुण मिळवत सुवर्णपदक मिळवलं. यापूर्वी रुद्रांक्षने आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. रुद्रांक्षनं गुरुनानक देव विद्यापीठ, अमृतसर इथल्या ऑलिंपियन नेमबाज ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर याला एका गुणानं मात...