June 22, 2024 9:35 AM June 22, 2024 9:35 AM
31
दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा
दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस काल जगभरात मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत योग दिनाचा मुख्य कार्यक्रम जम्मू आणि काश्मीर मधील श्रीनगर इथं शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात संपन्न झाला. यावेळी मोदी यांनी आपल्या भाषणात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये योगाभ्यासाचे महत्त्व स्पष्ट केले. योगाभ्यास ही आत्मोन्नतीचे सर्वोत्तम साधन असल्याचं आपल्या भाषणात नमूद केलं. योग ही जगभरातील विविध संस्कृतीतील आणि विविध पार्श्वभूमी असलेल्या लोकांन...