July 16, 2024 8:15 PM July 16, 2024 8:15 PM
10
मुंबईतल्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात ३५ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव
३५ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा मुंबईतल्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात गौरव करण्यात आला. यावर्षी कझाकस्तान इथं झालेल्या ऑलिम्पियाड स्पर्धेत मुंबईतल्या वेदांत साक्रे याने सुवर्ण, रत्नागिरीतल्या ईशान पेडणेकरसह चेन्नईच्या श्रीजीथ शिवकुमार आणि उत्तरप्रदेशातल्या बरेली इथल्या यशस्वी कुमारने रौप्य पदक जिंकलं होतं. या स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व मुंबई टीडीएम लॅबचे प्रा. शशीकुमार मेनन आणि टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या डॉ. मयुरी रेगे ...