June 13, 2025 11:03 AM June 13, 2025 11:03 AM

views 14

अहिल्यानगर – वारकर्‍यांच्या सुविधांसाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर

अहिल्यानगर जिल्ह्यातून आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या पालख्यांसोबतच्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने २ कोटी ६१ लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातून दरवर्षी सुमारे १६० स्थानिक पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात.

February 3, 2025 3:19 PM February 3, 2025 3:19 PM

views 17

३७ व्या पक्षिमित्र संमेलनाचा अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे समारोप

३७ व्या पक्षिमित्र संमेलनाचा समारोप काल अहिल्यानगर जिल्ह्यात शेवगाव इथे झाला. पक्षी संवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरण संतुलनाचं उल्लेखनीय काम महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना करीत आहे, त्यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करून विविध प्रकल्प मार्गी लावावेत, असं मत या संमेलनात व्यक्त झालं. या दोन दिवसीय संमेलनात पक्षी संवर्धनाशी संबंधित मुद्द्यांवर उहापोह झाला, तसंच जायकवाडी इथे पक्षी निरीक्षणही करण्यात आलं. राज्यभरातून अनेक पक्षीप्रेमी या संमेलनात सहभागी झाले होते.

January 22, 2025 1:58 PM January 22, 2025 1:58 PM

views 10

अहिल्यानगर जिल्ह्यात सकाळी झालेल्या कार अपघातात तीन जणांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या कार अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अपघातग्रस्त कुटुंब एका लग्नसोहळ्यावरून घरी परतत असतानाच हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

January 16, 2025 3:34 PM January 16, 2025 3:34 PM

views 14

चारचाकी गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू

अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड नगरपरिषदेच्या जांबवाडी इथं चारचाकी गाडी विहिरीत पडून काल झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. हे चौघेजण मातकुळीहून जांबवाडीमार्गे जामखेडकडे येत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पडली. ग्रामस्थांनी विहिरीत पडलेल्या तरुणांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी चारही जणांना मृत घोषित केलं.