November 13, 2024 2:28 PM

views 21

अवैध फेरीवाले उभे राहणाऱ्या ठिकाणांवर मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांनी निगराणी ठेवावी, मुंबई उच्च न्यालयाचे निर्देश

अवैध फेरीवाले उभे राहणाऱ्या मुंबईतल्या २० ठिकाणांवर मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांनी कडक आणि कायमस्वरूपी निगराणी ठेवावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यालयानं दिले आहेत. संपूर्ण मुंबईत २० संवेदनशील ठिकाणांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलं असून यामुळे याभागातल्या रस्त्यांवर नागरिकांना चालणं मुश्किल झाल्याचं नोंदवत न्यायालयानं राज्य सरकार आणि पोलिसांच्या कामकाजाच्या पद्धतीवर ताशेरे ओढले. दरम्यान, फेरीवाले शहर समितीची निवड होऊन या समितीनं वैध फेरीवाले नोंदवल्यानंतर अवैध फेरीवाल्यांचा प्रश्न सुटेल, असं फेरी...