April 15, 2025 11:06 AM April 15, 2025 11:06 AM

views 4

नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत आज अवकाळी पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्रात काल तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडला. मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस झाला. नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत आजही अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, राज्यात आज सर्वात जास्त ४२ पूर्णांक ४ अंश सेल्सिअल तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं ३९ पूर्णांक सहा, तर छत्रपती संभाजीनगर आणि परभणी इथं सरासरी ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  

April 5, 2025 3:37 PM April 5, 2025 3:37 PM

views 13

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल – कृषीमंत्री कोकाटे

राज्याच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पाऊस तसंच गारपिटीचा फटका बसला असून, पंचनाम्याचे आदेश संबंधित कृषी विभागाला देण्यात आले असल्याचं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. नाशिक इथं काल प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. राज्यातल्या २४ जिल्ह्यांतील ११० तालुक्यांमध्ये २६ ते २७ हजार एकरांवरील पिकं जमीनदोस्त झाली आहेत, त्यामुळं येत्या पुढील चार-पाच दिवसांत आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत बैठक घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल तसंच पीक विम्याचं पुनर्गठन ...

April 1, 2025 3:26 PM April 1, 2025 3:26 PM

views 16

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर १४ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

राज्यातल्या बहुतेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामानखात्याने दिला आहे. जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात घाटमाथा परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना, सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.येत्या दोन दिवसांसाठी ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसेच अकोला, अमरावती , बुलढाणा, कोल्हापूर, सांगली , बीड, लातूर, भंडारा, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमधे अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.