June 17, 2024 10:21 AM June 17, 2024 10:21 AM

views 30

नागरिकांना जलद न्याय देण्यासाठी १ जुलैपासून ३ नवे फौजदारी कायदे लागू करण्यात येणार

नागरिकांना जलद, वेळेवर आणि त्रुटिमुक्त न्याय देण्यासाठी देशात येत्या १ जुलैपासून ३ नवे फौजदारी कायदे लागू करण्यात येणार आहेत. देशातील परिस्थिति आणि बदलणाऱ्या कालानुरूप, कायद्यांमध्ये ही सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचं मत केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी काल कोलकाता इथं व्यक्त केलं. ‘फौजदारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनातील भारताचा प्रगतिशील मार्ग’ या विषयावर आयोजित परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. भारतातील सद्यस्थितीतील अनेक कायदे ब्रिटिशकालीन असून ते बदलण्याची माग...