August 31, 2024 1:15 PM August 31, 2024 1:15 PM
10
अरबी समुद्रावरल्या ‘आस्ना’ चक्रीवादळामुळे अनेक राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
चक्रीवादळ ‘आस्ना’ पुढल्या चोवीस तासात अरबी समुद्रावरुन वायव्य आणि इशान्येच्या दिशेने सरकेल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. या चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुजरातमध्ये गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडला. अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओदिसा, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकची किनारपट्टी तसंच यानम पुदुचेरी इथं दोन दिवसात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढच्या सहा दिवसात राज्यात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. ...