September 25, 2024 9:59 AM September 25, 2024 9:59 AM

views 13

अमेरिकेच्या तीन दिवसांच्या यशस्वी दौऱ्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मायदेशात आगमन

अमेरिकेच्या तीन दिवसांच्या यशस्वी दौऱ्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल नवी दिल्लीत दाखल झाले. या दौऱ्यात त्यांनी क्वाड परिषद, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील परिषद या दोन महत्त्वाच्या कार्यक्रमांसह अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि क्वाड नेत्यांच्या भेटी, भारतीय समुदायाशी संवाद अशा अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. डेलावेअरमधील विल्मिंग्टन इथं झालेल्या सहाव्या वार्षिक क्वाड परिषदेत आणि न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो...

September 19, 2024 6:28 PM September 19, 2024 6:28 PM

views 6

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या २१ ते २३ तारखेपर्यंत अमेरिका दौऱ्यावर जाणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या २१ ते २३ तारखेपर्यंत तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री येत्या शनिवारी विल्मिंग्टन इथं होणाऱ्या चौथ्या क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. रविवारी ते अमेरिकेतल्या भारतीय समुदायाशी संवाद साधतील. तर सोमवारी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत भविष्यातली परिषद या विषयीच्या परिषदेला संबोधित करतील. कृत्रिम बुद्घिमत्ता...

August 24, 2024 11:14 AM August 24, 2024 11:14 AM

views 23

भारत – अमेरिका दरम्यान महत्त्वाचा संरक्षण करार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.  संरक्षण मंत्र्यांच्या या भेटीत भारत आणि अमेरिकेत पुरवठा सुरक्षा व्यवस्था करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. या करारातून परस्परांना संरक्षण सामग्री पुरवठ्यात प्राधान्य देण्याचं मान्य झालं.    अमेरिकेबरोबर असा करार करणारा भारत हा अठरावा देश आहे.  दोन्ही देशांमध्ये संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबतही सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.  सध्या आणि भावी काळातल्या संरक्षण विषयक सहयोगासंदर्भात राजनाथ सिंह अमेरिकन संरक्षण उद्योगाबरोबर...

June 26, 2024 8:19 PM June 26, 2024 8:19 PM

views 18

युक्रेनला अमेरिकेचं आर्थिक पाठबळ राहील तोपर्यंत रशिया- युक्रेन युद्ध थांबण्याची शक्यता नसल्याची रशियाच्या राजदूताची स्पष्टोक्ती

अमेरिका जोपर्यंत युक्रेनला युद्धासाठी आर्थिक पाठबळ देत राहील तोपर्यंत रशिया- युक्रेन युद्ध थांबण्याची शक्यता नाही, असं आज रशियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे विशेष राजदूत रॉडिऑन मिरोशनिक यांनी सांगितलं. ते मुंबईत रशियन हाऊस इथं तज्ञांशी आणि प्रसारमाध्यमांशी बोलत होते. युक्रेनला मदत करणं अमेरिकेनं थांबवलं तरच युद्धबंदी होऊन शांतता नांदेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.