November 10, 2024 5:02 PM November 10, 2024 5:02 PM

views 11

भाजपाचं संकल्पपत्र अमित शाह यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध

भारतीय जनता पार्टीचा निवडणूक जाहीरनामा शेतकऱ्यांचा सन्मान, आणि गरीबांची सेवा करणारा, युवकांना रोजगाराच्या नव्या संधी देणारा आणि महिलांचं सक्षमीकरण करणारा असा असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत भाजपाचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर बोलत होते. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम दीड हजार रुपयांवरून एकवीसशे रुपये करणार, महिला सुरक्षेसाठी २५ हजार महिलांचा पोलिस दलात समावेश केला जाणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी, २५ लाख रोजगारांची निर्मिती, अशी अनेक आश्वासनं य...

October 1, 2024 3:55 PM October 1, 2024 3:55 PM

views 11

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मुंबई तसंच ठाणे आणि कोकण विभागातल्या भाजप आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या मेळाव्यात  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मुंबईतले भाजपचे मंत्री, आमदार, खासदार भाग घेत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीच्या जागावाटपासंदर्भात गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याचं समजतं.

June 17, 2024 2:36 PM June 17, 2024 2:36 PM

views 34

मणीपूरमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री उच्चस्तरीय बैठक घेणार

मणीपूरमधल्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. केंद्र तसंच राज्यातले वरिष्ठ अधिकारी, लष्कर आणि अन्य सुरक्षा दलातले वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी होतील.