June 20, 2025 2:17 PM June 20, 2025 2:17 PM

views 12

केंद्रीय गृहमंत्री आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने आयोजित राष्ट्रीय परिसंवादात होणार सहभागी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्तानं आयोजित राष्ट्रीय परिसंवादात सहभागी होणार आहेत. तसंच महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या नव्या मुख्यालयाचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते आज होणार आहे. अमित शहा यांनी काल बेंगळुरूमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची भेट घेतली. आदिचुंचनागिरी विद्यापीठाच्या बेंगळुरू इथल्या संकुलाचं उद्घाटन आज शहा यांच्या हस्ते झालं.

December 8, 2024 3:44 PM December 8, 2024 3:44 PM

views 5

देशाच्या सीमा संरक्षणाला मजबुती देण्याचं काम सीमा सुरक्षा दल करत असल्याचं अमित शहा यांचं प्रतिपादन

सीमा सुरक्षादल गेली ६ दशकं देशाच्या सीमा सुरक्षेला मजबुती देण्याचं महत्त्वपूर्ण काम करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी केलं. ते आज जोधपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या ६०व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सीमा सुरक्षा दलाच्या योगदानाशिवाय देशासमोरच्या सुरक्षा आव्हानांना सामोरं जाणं अशक्य असल्याचंही ते म्हणाले. जोधपूरमधल्या सीमा सुरक्षा दलाच्या राजस्थान फ्रंटिरियर हेडक्वार्टरमध्ये पहिल्यांदाच संचलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. संचलनात स्वदेशी हेलिकॉप्टर ध्रुव आ...

October 3, 2024 8:20 PM October 3, 2024 8:20 PM

views 13

गुजरातमधल्या ४७० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते

महात्मा गांधी यांच्यानंतर स्वच्छता मोहीमेला लोकचळवळीचं रुप मिळवून देणारे आणि स्वच्छता संस्कृती लोकांमध्ये रुजवण्यात महत्वाचं योगदान देणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे प्रमुख नेते आहेत, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. गुजरातमधल्या अहमदाबाद इथं आज अमित शहा यांच्या हस्ते ४७० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं, त्यानंतर ते जनसभेला संबोधित करत होते.  अमित शहा यांनी अहमदाबादमध्ये आज भाजपाच्या कार्यकर्ता संमेलनात सहभागी होऊन त्यांना मार्गदर्शन केलं.

June 22, 2024 8:18 PM June 22, 2024 8:18 PM

views 6

इमिग्रेशन प्रक्रिया वेगवान होण्यासाठी दिल्ली विमानतळावर नव्या सुविधेचं लोकार्पण

आंतरराष्ट्रीय विमान प्रवासात इमिग्रेशन प्रक्रिया वेगानं व्हावी यासाठी केंद्र सरकारनं FTI-TTP अर्थात फास्टट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्रॅम नावाची विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दिल्ली विमानतळावर झालं. याचा लाभ भारतीय नागरिक आणि अनिवासी भारतीयांना होईल. यामुळे भारतीय आणि अनिवासी भारतीय नागरिक यांचा विमान प्रवास अधिक वेगवान, सुरळीत आणि सुरक्षित होईल, असा विश्वास यावेळी शहा यांनी व्यक्त केला आहे. योजनेसाठी पात्र असलेल्या नागरिकांना...