April 1, 2025 3:20 PM April 1, 2025 3:20 PM

views 29

राजकीय पक्षांच्या शंकांचं निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगाने राबवलं व्यापक अभियान

राजकीय पक्षांच्या शंकांचं निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगाने एक व्यापक अभियान नुकतंच राबवलं. २५ दिवसांच्या या अभियानात निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या २८ हजार प्रतिनिधींबरोबर चर्चा केली. निवडणूक नोंदणी अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या ४ हजार ७१९ बैठका झाल्या. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून या बैठकांचे अहवाल मागवण्यात आले आहेत.

February 11, 2025 9:36 AM February 11, 2025 9:36 AM

views 7

ब्रह्मकुमारी संस्थेच्या वैश्विक संस्कृती, प्रेम, शांतता आणि सद्भावना अभियानाचं राज्यपालांच्या उपस्थितीत उद्घाटन

आजच्या आधुनिक जगात मनुष्य एकीकडे प्रगती करत असताना दुसरीकडे तो वैयक्तिक आणि भावनिक स्तरावर अशांत होत आहे; अशावेळी ब्रह्मकुमारी संस्थेच्या भगिनींचं समाजात प्रेमभावना, शांतता आणि सद्भावना प्रसाराचं कार्य अतिशय प्रशंसनीय आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं. ब्रह्मकुमारी संस्थेच्या वैश्विक संस्कृती, प्रेम, शांतता आणि सद्भावना अभियानाचं उद्घाटन राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत राजभवन इथं झालं, त्यावेळी ते बोलत होते.  

January 22, 2025 3:13 PM January 22, 2025 3:13 PM

views 21

एसटीच्या सर्व बस स्थानकांवर “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान” राबवविणार – प्रताप सरनाईक

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षभर राज्यभरातल्या एसटीच्या सर्व बसस्थानकांवर “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान” राबवण्यात येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतची घोषणा केली. यानिमित्तानं राज्यभरात प्रत्येक बसस्थानकावर शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. वर्षभर चालणाऱ्या या अभियानामध्ये दर तीन महिन्यांनी प्रत्येक बसस्थानकाचं मूल्यमापन होणा...