July 11, 2024 1:00 PM July 11, 2024 1:00 PM

views 12

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रूपांतरित करण्यात आलेल्या जिल्हा आणि प्रादेशिक रुग्णालयांना केंद्राकडून निधीचा पुरवठा होत राहील – आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाचं स्पष्टीकरण

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रूपांतरित करण्यात आलेल्या जिल्हा आणि प्रादेशिक रुग्णालयांना केंद्र सरकारकडून निधीचा पुरवठा होत राहील असं आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी याबाबत राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून स्पष्टीकरण दिलं आहे. अशा 157 रूपांतरित वैद्यकीय महाविद्यालयांपैकी 108 आधीच कार्यान्वित झाल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. सध्या देशात 706 वैद्यकीय महाविद्यालयं आहेत.