January 15, 2025 4:08 PM January 15, 2025 4:08 PM

views 17

मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर जवळ झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू

मुंबई नाशिक महामार्गावर वर शहापूर जवळ पाच वाहनांचा विचित्र अपघात होऊन त्यात तिघांचा मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले. कंटेनर, ट्रक आणि खाजगी बस मिळून पाच वाहनांचा अपघातात समावेश आहे. आज पहाटे 3 च्या सुमारास हा अपघात झाला. पोलिस आणि ग्रामस्थांनी जखमींना शहापूरच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.

January 15, 2025 10:11 AM January 15, 2025 10:11 AM

views 15

लडाखमध्ये, कारगिलमधील राष्ट्रीय महामार्ग एकवर झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू

लडाखमध्ये, कारगिलमधील राष्ट्रीय महामार्ग एकवर कटपाकासी शिलिकचे इथं काल एका स्कॉर्पिओची ट्रिपरशी टक्कर होऊन झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन स्थानिक रहिवाशांचा समावेश आहे. जखमींवर कारगिल जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

January 13, 2025 10:33 AM January 13, 2025 10:33 AM

views 12

चालकाने प्रसंगावधान राखल्याने अंबाजोगाई तालुक्यात बस अपघाताचा अनर्थ टळला

चालकानं प्रसंगावधान राखल्यानं अंबाजोगाई तालुक्यात काल बस अपघाताचा मोठा अनर्थ टळला. तालुक्यातल्या पठाण मांडवा घाटात प्रवाशी घेऊन जाणाऱ्या बसचे ब्रेक निकामी झाले. बस चालक पारजी उबाळे यांनी यावेळी प्रसंगावधान दाखवत बस घाटाच्या कठड्यावर आदळवली. यात ती घाटातल्या झाडांना अडकून अपघात टळला.

December 7, 2024 11:31 AM December 7, 2024 11:31 AM

views 14

उत्तर प्रदेशातील कनौज जिल्ह्यातील आग्रा-लखनौ महामार्गावर झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील कनौज जिल्ह्यातील आग्रा-लखनौ महामार्गावर काल झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर, 18 जण गंभीर जखमी झाले. जखमींना सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लखनौहून दिल्लीला जाणाऱ्या बसच्या चालकाचं नियंत्रण सुटून, बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅकवर आदळल्यामुळे हा अपघात झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर, जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांचं अर्थसहाय्य घोषित...

December 5, 2024 9:18 AM December 5, 2024 9:18 AM

views 7

समृद्धी महामार्गावर कार आणि कंटेनर अपघातात छत्रपती संभाजीनगर इथल्या दोघांचा मृत्यू

नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर नाशिक जिल्ह्यात सिन्नर इथं कार कंटेनरला धडकून झालेल्या अपघातात छत्रपती संभाजीनगर इथल्या बहुजन समाज पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. मुंबईहून बसपाची समिक्षा बैठक आटोपून ते परतत असताना काल पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. सचिन बनसोडे आणि प्रशांत निकाळजे अशी मृतांची नावं आहेत.

November 12, 2024 2:32 PM November 12, 2024 2:32 PM

views 17

उत्तराखंडमध्ये डेहराडून शहरात झालेल्या भीषण कार अपघातात ६ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधे डेहराडून शहरात काल रात्री उशिरा झालेल्या भीषण कार अपघातात ६जणांचा मृत्यू झाला. तर एका प्रवाशाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरधाव कंटेनरने इनोव्हा कारला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला, असं पोलिसांनी सांगितलं.

November 11, 2024 9:32 AM November 11, 2024 9:32 AM

views 15

दुचाकीला ट्रॅक्टरने धडक देऊन झालेल्या अपघातात तीघांचा मृत्यू

परभणी शहराजवळ वसमत महामार्गावरव दुचाकीला ट्रॅक्टरने धडक देऊन झालेल्या अपघातात पती-पत्नी आणि मुलाचा जागेवरच मृत्यू झाला. एकनाथ घुगे हे पत्नी शुभांगी आणि मुलगा समर्थ यांच्यासह परभणी इथून हिंगोली जिल्ह्यात औंढा तालुक्यातल्या अंजनवाडी गावाकडे दुचाकीवर जात असताना विना नंबरच्या ट्रॅक्टर चालकाने भरधाव वेगात उलट दिशेने येऊन त्यांना धडक दिल्यानं हा अपघात झाला. मयत एकनाथ घुगे हे रिसोड बस डेपोत वाहक म्हणून कार्यरत होते.

November 9, 2024 2:03 PM November 9, 2024 2:03 PM

views 10

आग्रा-लखनौ महामार्गावर झालेल्या अपघातात पाच जण ठार

उत्तर प्रदेशमध्ये फिरोझाबाद जिल्ह्यात आग्रा-लखनौ महामार्गाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनाला एका बसगाडीनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. ही बस मथुरेहून लखनौला जात होती. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

September 28, 2024 8:30 PM September 28, 2024 8:30 PM

views 10

तांझानिया मध्ये ट्रकला झालेल्या अपघातात ११ जण ठार

तांझानिया मध्ये ट्रकला झालेल्या अपघातात ११ जण ठार झाले असून इतर २१ जण जखमी झाले. तांझानियाच्या दक्षिणेकडच्या मेब्या या डोंगराळ भागात आज सकाळी हा अपघात झाला. भरधाव वेगानं जाणारा ट्रक घाटात उलटून हा अपघात झाला. यातील ५ जणांचा जागीच तर ६ जणांचा रुग्णालयात नेतांना मृत्यू झाला.

September 7, 2024 2:07 PM September 7, 2024 2:07 PM

views 12

उत्तर प्रदेशात बस अपघातात १२ जणांचा मृत्यू,

उत्तर प्रदेशात, हातरस जिल्ह्यात काल एक वाहन आणि राज्य परिवहनाची बस यांच्यात झालेल्या धडकेत चार मुलांसह किमान 12 जण ठार झाले. या अपघातात अन्य 16 जण जखमी झाले आहेत. आकाशवाणी न्यूजशी बोलताना हातरसच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितलं की, राष्ट्रीय महामार्ग-93 वर चांदपा पोलीस स्थानक हद्दीतील मीताई गावाजवळ ही दुर्घटना घडली. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातरस रस्ता अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.