June 18, 2025 3:13 PM June 18, 2025 3:13 PM

views 12

मुंबई- पुणे महामार्गावर भातण बोगद्यात सात ते आठ वाहनं एकमेकांवर आदळल्यामुळे अपघात

मुंबई- पुणे महामार्गावर भातण बोगद्यात आज सकाळी सात ते आठ वाहनं एकमेकांवर आदळल्यामुळे अपघात झाला. या अपघातात १० ते १२ पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना पनवेल इथं एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त वाहनांमध्ये तीन ते चार पोलिस गाड्या, एक एसटी महामंडळाची बस, एक टेम्पो, एक स्कॉर्पिओ आणि एक जीप यांचा समावेश आहे. या सर्व गाड्या मुंबईहून पुण्याकडे जात होत्या. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

April 17, 2025 2:05 PM April 17, 2025 2:05 PM

views 13

बसने एका रिक्षाला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू

गुजरातच्या पाटण जिल्ह्यात समी - राधनपूर महामार्गावर गुजरात राज्य परीवहन महामंडळाच्या बसने एका रिक्षाला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात रिक्षात बसलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळावर पोचून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.  

April 15, 2025 2:54 PM April 15, 2025 2:54 PM

views 11

बुलडाणा – बस आणि ट्रक चा अपघात होऊन ४ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातल्या बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर बस आणि ट्रक चा अपघात होऊन ४ जणांचा मृत्यू झाला तर १० जण गंभीररीत्या जखमी झाले. जखमींना खामगाव इथल्या रुग्णालयात दाखल केलं आहे. मध्यप्रदेश परिवहन निगमची बस अकोल्याहून नांदुराकडे जात असताना समोरुन येणाऱ्या मालवाहू वाहनाशी टक्कर झाल्याने अपघातग्रस्त झाली. ट्रकमधल्या ३ मजुरांचा त्यात मृत्यू झाला.

April 5, 2025 3:31 PM April 5, 2025 3:31 PM

views 13

लातूर – टेम्पोने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू

लातूर शहरात गंजगोलाई भागात एका टेम्पोनं मोटारसायकलला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात आज एका तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी टेम्पोसह ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आहे. तर याच भागात एका जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळून त्याखाली एक रिक्षा आणि दोन दुचाकी अडकल्या. मात्र यात जीवितहानी झाली नाही.

April 5, 2025 11:21 AM April 5, 2025 11:21 AM

views 15

छत्रपती संभाजीनगर – चारचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल चारचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. वैजापूर तालुक्याच्या नांदगाव शिवारात हा अपघात झाला, वाहनचालकाचं नियंत्रण सुटलेली चारचाकी खड्ड्यात आदळून हवेत उडाली, आणि उच्च दाब विद्युत तारांवर आदळून खाली पडल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

February 6, 2025 3:52 PM February 6, 2025 3:52 PM

views 14

हिंगोली – बसने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन जण ठार

भरधाव वेगाने जाणाऱ्या विनक्रमांकाच्या स्कूल बसने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव- रिसोड रस्त्यावर काल घडली. या अपघातात जखमी झालेल्या दोघांना सेनगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र दाखल होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शोरुममधून निघालेल्या या स्कूल बसचं रजिस्ट्रेशनही झालेले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. बसचालक फरार आहे.  

February 5, 2025 10:54 AM February 5, 2025 10:54 AM

views 16

ट्रक आणि दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू

जालना-राजूर रस्त्यावर बावणेपांगरी फाट्याजवळ मध्यरात्री भरधाव ट्रक आणि दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

February 3, 2025 3:16 PM February 3, 2025 3:16 PM

views 16

कोल्हापूर जिल्ह्यातल्या हळदी-काडगाव मार्गावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, ३० जण जखमी

कोल्हापूर जिल्ह्यातल्या हळदी-काडगाव मार्गावर काल रात्री एका खासगी बसला झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले. जखमींना छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. ही बस गोव्याहून छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या एका खासगी कंपनीचे १४५ कर्मचारी ४ बसमधून गोव्याला सहलीसाठी गेले होते.त्यातली एक बस अपघातग्रस्त झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.      

January 22, 2025 1:58 PM January 22, 2025 1:58 PM

views 12

अहिल्यानगर जिल्ह्यात सकाळी झालेल्या कार अपघातात तीन जणांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या कार अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अपघातग्रस्त कुटुंब एका लग्नसोहळ्यावरून घरी परतत असतानाच हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

January 16, 2025 3:34 PM January 16, 2025 3:34 PM

views 15

चारचाकी गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू

अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड नगरपरिषदेच्या जांबवाडी इथं चारचाकी गाडी विहिरीत पडून काल झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. हे चौघेजण मातकुळीहून जांबवाडीमार्गे जामखेडकडे येत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पडली. ग्रामस्थांनी विहिरीत पडलेल्या तरुणांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी चारही जणांना मृत घोषित केलं.