September 6, 2025 10:32 AM September 6, 2025 10:32 AM

views 22

अतिवृष्टीबाधित एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही – दत्तात्रय भरणे

अतिवृष्टीबाधित एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह राज्याच्या २९ जिल्ह्यांमधल्या १९१ तालुक्यांमध्ये १४ लाख ४४ हजार ७४९ हेक्टर क्षेत्रावरील पीक बाधित झालं आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक सहा लाख २० हजार ५६६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं असून, धाराशिव जिल्ह्यात एक लाख ५० हजार ७५३ हेक्टर तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे.

October 15, 2024 2:35 PM October 15, 2024 2:35 PM

views 10

अतिवृष्टीने बाधित झालेल्या श्रीलंकेत पावसाचा जोर ओसरेल, श्रीलंकेच्या हवामान विभागाचा अंदाज

अतिवृष्टीने बाधित झालेल्या श्रीलंकेत पावसाचा जोर ओसरेल असा अंदाज आहे. श्रीलंकेच्या हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात आग्नेय भागात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिम वायव्य दिशेला सरकण्याची शक्यता असल्यामुळे हवामान काहीसे निवळेल. दरम्यान श्रीलंकेत पूरग्रस्तांसाठी राष्ट्राध्यक्ष अनुरा दिस्सानायके यांनी ५० मिलीयन श्रीलंकन रुपयांची मदत मंजूर केली आहे. खराब हवामानामुळे दीड लाख नागरिक संकटात आल्याचं श्रीलंकेच्या आपदा व्यवस्थापन केंद्राने म्हटलं आहे. दहा हजार आपदग्रस्तांनी देश...

August 24, 2024 4:01 PM August 24, 2024 4:01 PM

views 16

गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोरम इथं उद्या अतिवृष्टी होण्याचा इशारा

गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोरम इथं उद्या अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, झारखंड, ओदिशा, पश्चिम बंगाल, मेघालय आणि पूर्व राजस्थानात मुसळधार पावसाची शक्यताही हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. तर उत्तर प्रदेश, पश्चिम राजस्थान, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि बिहार इथं आठवड्याभरात मुसळधार पावसाची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे.