February 6, 2025 11:23 AM February 6, 2025 11:23 AM

views 6

घाटी रुग्णालयाच्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन

छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात ‘घाटी’ च्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात येईल, असं आश्वासन, उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांनी दिलं. जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या आढावा घेतनाा ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत, जिल्ह्याचा २०२५-२६ या वर्षाचा आराखडा हा १२०० कोटी रुपयांचा तयार करण्यात आला असून, प्राप्त निधीचा विनियोग गुणवत्तापूर्ण कामांसाठी करा...

January 16, 2025 9:28 AM January 16, 2025 9:28 AM

views 15

तेविसाव्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

तेविसाव्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल बारामती इथं करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं आयोजित होणाऱ्या कबड्डी, खोखो, कुस्ती आणि व्हॉलीबॉल या चार राज्यस्तरीय स्पर्धांसाठी दिले जाणारे 75 लाख रुपयांचं अनुदान वाढवून एक कोटी रुपये करण्याची घोषणा पवार यांनी यावेळी केली. स्पर्धेत 16 महिला आणि 16 पुरुष संघ आणि 600 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत.  

October 1, 2024 9:07 AM October 1, 2024 9:07 AM

views 14

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. लातूर जिल्ह्यात उदगीर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेत ते काल बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी पवार यांच्या हस्ते उदगीर शहरातल्या विविध शासकीय इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं.

August 10, 2024 8:54 PM August 10, 2024 8:54 PM

views 5

सिन्नर तालुक्यात उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय, प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय तसंच सिन्नर आणि एमआयडीसी पोलीस ठाणे इमारतींचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

सिन्नर तालुक्यात उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय, प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय तसंच सिन्नर आणि एमआयडीसी पोलीस ठाणे अशा चार इमारतींचं लोकार्पण आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय हे १ मे २०२०पासून कार्यरत असून या ठिकाणी मूत्रपिंड आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी डायलिसिस सुविधा देणारं केंद्र लवकरच सुरू करण्यात येईल.

July 9, 2024 7:07 PM July 9, 2024 7:07 PM

views 12

विनियोजन विधेयक विधिमंडळात मंजूर

विनियोजन विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं. त्यापूर्वी महसूल, वनं, ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य, तसंच महिला आणि बालविकास विभागाच्या मागण्या विधानसभेनं मंजूर केल्या. त्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी विनियोजन विधेयक मांडलं. त्यावर बोलताना, हे सरकार अस्तित्वात असताना दोन - दोन वेळा अर्थसंकल्प सादर करण्याची गरज नव्हती, असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. ही परंपरा होऊ नये याची काळजी घ्यावी असं ते म्हणाले.  त्यावर यापूर्वी २०१४, आणि २०१९ साली देखील असंच झालं होतं, असं उपमुख्यम...

June 29, 2024 7:20 PM June 29, 2024 7:20 PM

views 15

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना दर महिन्याच्या ५ तारखेला आर्थिक मदतीचे पैसे खात्यात जमा करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, यासह विशेष सहाय्याच्या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. तसंच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरल्या खेळाडूंना अर्हतेनुसार शासकीय नोकरी मिळण्याच्या लाभापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आवश्यकतेनुसार निकषांमध्ये बदल करण्यात येतील, असं आश्वासनही त्यांनी दिलं.  पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान ह...

June 27, 2024 6:48 PM June 27, 2024 6:48 PM

views 8

जगदंबा देवस्थानाच्या विकासासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश

नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यात कोटमगाव इथं असलेल्या श्री जगदंबा देवस्थानाच्या विकासासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पवार यांनी आज विधिमंडळाच्या समिती कक्षात देवस्थान विकास आराखड्याबाबत बैठक घेतली. या देवस्थानाला भेट देणाऱ्या भाविकांसाठीचा प्रस्ताव ग्राम विकास विभागाने नियोजन विभागाकडे पाठवावा आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांनी देखील याबाबत बैठक घ्यावी असे निर्देश अजित पवार यांनी यावेळी दिले.

June 18, 2024 6:46 PM June 18, 2024 6:46 PM

views 13

खेळांना महत्व प्राप्त व्हावं यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकारिणीनं राष्ट्रीय क्रीडा संहितेचं काटेकोर पालन करत राज्यस्तरीय निवडणूक पार पाडावी, तसंच कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत राज्य कबड्डी असोसिएशन सल्लागार समिती आणि कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. येत्या शुक्रवारी कार्यकारिणीसाठी निवडणूक होणार असून, १९ जून ही जिल्हानिहाय मतदारांची नावं स्विकारण्याची अंतिम तारीख असल्याचं त्यांनी सांगितलं. खेळांना महत्...

June 14, 2024 7:50 PM June 14, 2024 7:50 PM

views 24

आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना सर्व आवश्यक सोयी सुविधा देण्याचे राज्य सरकारचे प्रशासनाला आदेश

    आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याकरता पंढरपूर पालखी मार्ग, पालखी तळ आदी ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित विभागांना दिले. ते पुणे इथल्या विधान भवनात झालेल्या श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत बोलत होते. इंद्रायणी नदी स्वच्छतेचं काम तातडीनं करावं, पालखी सोहळा झाल्यानंतर पंढरपूर शहरात स्वच्छतेसाठी आवश्यक नियोजन करावं, मानाच्या पालख्यांसह इत...