August 10, 2024 7:37 PM August 10, 2024 7:37 PM

views 8

अजिंठा लेणी रेल्वे जोडणी हा प्रादेशिक औद्योगिक विकासाला चालना देणारा प्रकल्प असल्याची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची माहिती

अजिंठा लेणी रेल्वे जोडणी हा प्रादेशिक औद्योगिक विकासाला चालना देणारा हा प्रकल्प असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना या प्रकल्पाविषयी माहिती दिली. या प्रकल्पाअंतर्गत जालना ते जळगाव असा १७४ किलोमीटर लांबीचां रेल्वेमार्ग विकसित केला जाईल. या मार्गामुळे दोन्ही जिल्ह्यातलं प्रवासाचं अंतर ५० टक्क्याने कमी होईल असं त्यांनी सांगितलं. या प्रकल्पासाठी ९३५ हेक्टर जमीन संपादित केली जाणार असून पुढच्या चार ते पाच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणं...