June 17, 2024 12:22 PM June 17, 2024 12:22 PM
36
अग्निपथ योजना सैनिक सन्मान योजना म्हणून पुन्हा सुरू झाल्याच्या अफवांचे सरकारकडून खंडन
देशात सुरु असलेली अग्नीपथ ही योजना काही बदल करुन सैनिक समान योजना या नावानं पुन्हा सुरु केली जाणार असल्याचे समाजमाध्यमांवर फिरत असलेले संदेश निव्वळ अफवाच असल्याचं पत्र सूचना कार्यालयानं कळवलं आहे. या संदेशात या योजनेत काही बदल करण्यात आल्याचं म्हटलं आहे तेही खोडसाळपणाचं असल्याचंही कार्यालयानं कळवलं असून नागरिकांनी या संदेशांवर विश्वास ठेवू नये असंही म्हटलं आहे.