February 7, 2025 3:39 PM February 7, 2025 3:39 PM

views 8

अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाकडून नवी मुंबईत २०० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

NCB, अर्थात अमली पदार्थ विरोधी पथकानं गेल्या आठवड्यात नवी मुंबईत केलेल्या कारवाईत अंदाजे २०० कोटी रुपये किमतीचे विविध प्रतिबंधित पदार्थ जप्त केले. या कारवाईत NCB नं ४ जणांना अटक केली आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या अमेरिकेतल्या एका टोळीनं मालवाहू सेवा, आणि मानवी तस्करांच्या माध्यमातून हे पदार्थ भारतात पाठवल्याचं NCB च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

July 2, 2024 7:51 PM July 2, 2024 7:51 PM

views 7

मुंबई विमानतळावर अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या भारतीय प्रवाशाला मुद्देमालासह अटक

महसूल गुप्तवार्ता संचालनाच्या अधिकाऱ्यांनी काल मुंबई विमानतळावर अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका भारतीय प्रवाशाला मुद्देमालासह अटक केली. हा प्रवासी बँकाॅकहून मुंबईला आला होता. या प्रवाशाकडे ५ कोटी रुपये किंमतीचे गांजा सदृश अंमली पदार्थ सापडले. या प्रवाशावर अंमली पदार्थ प्रतिंबधीत कायद्याखाली गुन्हा दाखल केल्याचं संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

June 14, 2024 8:21 PM June 14, 2024 8:21 PM

views 25

आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणार रॅकेट अटकेत

नवी दिल्लीतल्या अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकानं आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणार रॅकेट पकडलं असून त्यांच्याकडून २० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केली. याप्रकरणातील दोन मुख्य सुत्रधारांना अटक केली असून त्यातील एक नायजेरियाचा तर दुसरा आयवरी कोस्टचा असल्याचं विशेष पथकानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलं. या दोघांकडून सुमारे सहा किलो मेथमफेटामाइन हा अंमली पदार्थ जप्त केल्याचंही पत्रकात नमूद केलं आहे. हे दोघेही बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्य करत असल्याचं तपासातून पुढं आलं असू...