July 2, 2024 7:19 PM July 2, 2024 7:19 PM

views 25

अंबादास दानवे यांचं निलंबन हा एकतर्फी, आणि लोकशाहीविरोधी निर्णय असल्याची उद्धव ठाकरे यांची टीका

विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन हे एकतर्फी असून हा लोकशाहीविरोधी निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. सभागृहात एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा करणं, दोन्ही बाजू मांडू देणं आवश्यक असतं. मात्र दानवेंना बाजू मांडायला वेळ दिली गेली नाही, असं ठाकरे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. विधानपरिषद निवडणुकीतला आपला विजय झाकोळून टाकण्यासाठी हा निर्णय घेतला असून षडयंत्र रचून दानवे यांना निलंबित केल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला.

July 2, 2024 6:49 PM July 2, 2024 6:49 PM

views 16

सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ५ दिवसांसाठी निलंबित

सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्याचा ठराव आज विधानपरिषदेत आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा ठराव मांडला. यासंदर्भात विरोधकांची बाजू ऐकून घ्यावी, असा आग्रह विरोधी पक्षांनी केला, मात्र अशा प्रकारच्या ठरावांवर कधीही चर्चा होत नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस म्हणाले. यावर विरोधकांनी हौद्यात उतरून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात घोषणा दिल्या आणि सभात्याग केला. य...

June 29, 2024 7:24 PM June 29, 2024 7:24 PM

views 9

विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक लवकरात लवकर जाहीर करण्याची विरोधकांची मागणी

विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी आज विरोधकांनी विधानपरिषदेत केली. गेले अनेक दिवस विधानपरिषदेचं सभापतीपद रिक्त आहे हे संविधानाला धरून नाही असं सांगत शेकापचे जयंत पाटील यांनी आज कामकाज सुरू होताच हा मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील जयंत पाटील यांच्या मुद्द्याला समर्थन देत लवकरात लवकर निवडणूक घेण्याची मागणी केली. चर्चेच्या माध्यमातून सर्वसहमतीनं देखील सभापती निवडण्याची विरोधकांची तयारी आहे, असं ते म्हणाले. या संदर्भात निर्णय घेण्यास...