April 17, 2025 10:35 AM April 17, 2025 10:35 AM

views 12

अंबाजोगाई हे कवितांचं गाव म्हणून ओळखलं जाणार-मराठी भाषा मंत्र्यांची घोषणा

बीड इथं जिल्हा गुंतवणूक परिषद काल घेण्यात आली. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांनी ९०० कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. यातून असंख्य रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. बीड इथं कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, अंबाजोगाई हे कवितांचं गाव म्हणून जाहीर करणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल केली. ऐकूया या संदर्भातला हा विशेष वृत्तांत.. मराठीचे आ...

April 9, 2025 10:04 AM April 9, 2025 10:04 AM

views 11

अंबाजोगाई इथलं प्राचीन सकलेश्वर अर्थात बाराखांबी मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित

महाराष्ट्र शासनानं अंबाजोगाई इथलं ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर अर्थात बाराखांबी मंदिर, हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे. या निर्णयामुळे या ऐतिहासिक मंदिराच्या संवर्धन आणि संरक्षणासह पर्यटनालाही चालना मिळणार आहे. केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता.

January 13, 2025 10:33 AM January 13, 2025 10:33 AM

views 12

चालकाने प्रसंगावधान राखल्याने अंबाजोगाई तालुक्यात बस अपघाताचा अनर्थ टळला

चालकानं प्रसंगावधान राखल्यानं अंबाजोगाई तालुक्यात काल बस अपघाताचा मोठा अनर्थ टळला. तालुक्यातल्या पठाण मांडवा घाटात प्रवाशी घेऊन जाणाऱ्या बसचे ब्रेक निकामी झाले. बस चालक पारजी उबाळे यांनी यावेळी प्रसंगावधान दाखवत बस घाटाच्या कठड्यावर आदळवली. यात ती घाटातल्या झाडांना अडकून अपघात टळला.

December 8, 2024 11:03 AM December 8, 2024 11:03 AM

views 195

अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाला आजपासून प्रारंभ

अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवास आजपासून प्रारंभ होत आहे. आज सकाळी दहा वाजता वर्णी देण्याचा कार्यक्रम होणार आहे. १५ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या नवरात्र महोत्सवामध्ये कीर्तन, गायन, भजन, वाघ्या- मुरळी आदी कार्यक्रम होणार असल्याची माहिती, योगेश्वरी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे सचिव अशोक लोमटे यांनी दिली.

December 5, 2024 9:21 AM December 5, 2024 9:21 AM

views 33

अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव येत्या ८ ते १५ डिसेंबर या कालावधीत होणार

अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव येत्या ८ ते १५ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या महोत्सवात रामायणाचार्य रामराव ढोक महाराजांचं कीर्तन, अभंगवाणी, संगीत रजनी तसंच भजनासह विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.