April 1, 2025 2:24 PM April 1, 2025 2:24 PM
3
अंतराळवीर सुनीता विलियम्स हिने भारताच्या अवकाश कार्यक्रमात योगदान देण्याची व्यक्त केली इच्छा
भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विलियम्स हिनं भारताच्या अवकाश कार्यक्रमात योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नासा इथं काल ती एका वार्ताहर परिषदेत बोलत होती. अंतराळातून भारत देशाचं झालेलं दर्शन आणि विशेषतः हिमालयाच्या पर्वतरांगांचं दृश्य फारच विलोभनीय होतं असं ती म्हणाली. गुजरात आणि मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवरच्या मच्छीमारी होड्यांचं दृश्य पाहून आपल्याला जणू घरीच आल्याचा भास झाल्याचं ती म्हणाली. आपण लवकरच भारतभेटीवर येणार असल्याचं तिने यावेळी सांगितलं. सुनीताच्या आईवडिलांचा जन्म भारतात झाला हो...