July 23, 2024 1:56 PM July 23, 2024 1:56 PM
16
शेअर बाजारातल्या नफ्यावर अतिरीक्त कराची अर्थसंकल्पात तरतूद
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांवर अतिरीक्त कर लादण्याचा प्रस्ताव आजच्या अर्थसंकल्पात सादर झाला आहे. त्यामुळं लघु मुदतीच्या नफ्यावर १५ ऐवजी २० टक्के आणि दीर्घ मुदतीच्या नफ्यावर १० ऐवजी साडे १२ टक्के दराने कर द्यावा लागेल. कमी किंवा मध्यम उत्पन्न असणाऱ्यांना सध्या १ लाख रुपयांपर्यंतचा नफा करमुक्त असतो. ही मर्यादा वाढवून आता सव्वा लाख होणार आहे. डेब्ट म्युच्युअल फंडांवरही आता कर द्यावा लागेल. शेअर बाजारात फ्युचर्सचे व्यवहार करणाऱ्यांना आता २ शतांश टक्के आणि ऑप्शनवर १ दशांश टक्के दराने कर द्यावा लाग...