April 1, 2025 10:50 AM April 1, 2025 10:50 AM
14
येमेनमधील हुथी बंडखोरांवर अमेरिकेचे हल्ले धोका संपेपर्यंत सुरूच राहतील: राष्ट्राध्यक्ष ट्रम्प
अमेरिकेच्या जहाजांसाठी धोका असलेल्या येमेनमधील हुथी बंडखोरांची बंडखोरी थोपवण्यासाठी अमेरिकेचे हल्ले सुरू राहतील असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरील संदेशांत दिला आहे. गेल्या दोन आठवड्यांतील सतत सुरु असलेल्या हल्ल्यांमुळे इराण समर्थित हुथी दहशतवाद्यांना रोखण्यात अमेरिकेला यश आलं आहे. असं ट्रंप यांनी म्हटलं आहे. अमेरिकेने १५ मार्च रोजी प्रमुख सागरी मार्गांवर केमेरीन बेटानजिक अमेरिकी जहाजांना धमकावण्यासाठी हुथी बंडखोरांनी हल्ले केले. याला प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्...